Events – Prabodhini Trust Nashik

Events

आज दिनांक 10 sept. 2021 रोजी प्रबोधिनी ट्रस्ट या मानसिक दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थेतील सर्व विभागांना ( प्रबोधिनी विद्यामंदिर, प्रबोधिनी संरक्षित कार्यशाळा आणि श्रीमती सुनंदा केले विद्यामंदिर या विभागांना) मा. दिव्यांग कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे श्री. ओमप्रकाशजी देशमुख साहेब आणि नाशिक जिल्हा परिषद येथील डेप्युटी सी.ई.ओ. तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. रवींद्रजी परदेशी साहेब यांनी भेट दिली.

सध्या शिक्षक संस्थेतील दिव्यांग मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिकवत आहेत त्याचे आयुक्तांनी मनापासून कौतुक केले. तसेच दिव्यांगांच्या लसीकरासाठी सर्वच दिव्यांग संस्थांमधील शिक्षक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना शाबासकी दिली.

यावेळी वै.सा.का. श्री. विजय पाटील, सहायक सल्लागार श्री. कैलास उईके, प्रबोधिनी ट्रस्ट चे सचिव श्री. रमेश वैद्य, अध्यक्ष श्रीमती रोहिणी ढवळे, विभाग प्रमुख श्री. रमेश वानिस मुख्याध्यापक प्रबोधिनी विद्यामंदिर, सौ.संगीता पाटील कार्यशाळा प्रमुख, सौ.कल्पना वाघमारे प्रभारी मुख्याध्यापिका सुनंदा केले विद्यामंदिर तसेच संस्थेतील सर्व शिक्षक कर्मचारी वृंद उपस्थित होते.

img
img
img
 
img