आमचे विद्यार्थी कुठेही स्वतंत्रपणे प्रवास करू शकत नाही. शाळेत ने आण करणेसाठी संस्थेने सर्व विभागांसाठी स्कूलबसची व्यवस्था केलेली आहे. सातपूर, सिडको, पंचवटी, अंबड, नाशिक अशा सर्व भागातून बसने विद्यार्थी शाळेत येतात. प्रत्येक भागासाठी स्वतंत्र बसेस आहेत. ट्रस्टच्या ६ बसेस आहेत. विध्यार्थ्याकडून अल्प प्रमाणात बस फी आकारली जाते परंतु बरेच विद्यार्थी गरिबीमुळे बस फी भरू शकत नाही त्यामुळे तो सर्व खर्च ट्रस्टला करावा लागतो त्याचप्रमाणे बसचा देखभाल खर्च, बसचालक यांचा पगार सर्व ट्रस्टलाच करावा लागतो.यासाठी कुठल्याही प्रकारचे सरकारी अनुदान मिळत नाही.
देणगीद्वारे जर आम्हला ही मदत मिळाली तर ट्रस्टच्या बराच भार कमी होईल. दरवर्षी बसचा खर्च १८ ते २० लाख येतो.