अमेरिका स्थित डॉ. श्री. जगन्नाथ वाणी यांच्या देणगीतून सुसज्ज इमारत उभी राहिली त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या वहिनीचे नाव शाळेला देण्यात आले. डॉ. श्री. जगन्नाथ वाणी यांनी अनिवासी भारतीयाकडून ‘महाराष्ट्र सेवा समिती ऑर्गनायझेशन’ मार्फत ही देणगी मिळवून दिली. शाळेत ६ ते १८ वयोगटातील ९० विद्यार्थी विशेष शिक्षणाचा लाभ घेत आहेत.
२००० साली सुरु झालेल्या या शाळेला अजून पर्यत कुठलेही सरकारी अनुदान मिळालेले नाही. ९ विशेष शिक्षक, ३ सहशिक्षिका, ३ कलाशिक्षिका, ६ मदतनीस, एक लिपिक आणि शिपाई असा सर्व कर्मचारी वर्ग अल्पशा मानधनावर कार्यरत आहे.
ह्या मुलांना सांभाळण्यासाठी खूप संयम ठेवावा लागतो. प्रत्येक विद्यार्थ्यांचा बुध्यांक वेगळा आणि प्रत्येकाच्या समस्याही वेगळ्या असतात. पण तरीही सर्व शिक्षक कर्मचारी त्यांना आनंदाने सांभाळतात. त्यांच्याकडून जास्तीत जास्त कौशल्ये करवून घेतात.
शाळेच्या आवारात प्रशस्त फुलबाग आणि फळबाग आहे. महेंद्रा आणि महेंद्राने ७० फळझाडे लावली आहेत. नाशिक रनच्या देणगीतून प्रशस्त रँम्प उभारला आहे. आमदार निधीतून श्री. समीर भुजबळ यांनी स्टेज बांधून दिले आहे. सांस्कृतिक कार्यकमासाठी त्याचा चांगला उपयोग होतो बाकी सर्व कामकाज प्रबोधिनी विद्यामंदिर प्रमाणेच चालते.
२०१७ साली सर्वसामान्य मुलांच्या बालनाट्य/ एकांकिका स्पर्धेमध्ये सुनंदा केलेच्या विशेष मुलांना बालनाट्य सादर करण्यासाठी बेळगावला आमंत्रित करण्यात आले होते. विशेष मुलांनी सादर केलेल्या बालनाटयास [ कळीची किमया] हाउस फुल झालेल्या नाट्यगृहातील प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. एवढेच नव्हे तर दोनदा उभ्याने मानवंदना दिली. हीच आमच्या विशेष मुलांची खरी कमाई आहे. रसिकांच्या वतीने त्यांना अनेक भेटवस्तू बक्षीस म्हणून मिळाल्या तसेच विशेष पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. सुप्रसिद्ध अभिनेते श्री. संजय मोने यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला.
दिपक मंडळ नाशिक यांच्यातर्फे १२.१२.१२चे औचित्य साधून नाट्य सादरीकरणाच्या कार्यक्रमात सुनंदा केलेने सादर केलेल्या’ ‘वनराई’ या नाटकाची अमेझिंग बुक रेकोर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.
श्रीमती सुनंदा केले विद्यामंदिर
आय. टी. आय मागे सुशील आय हॉस्पिटल समोर सातपूर नाशिक
फोन नं – ०२५३-२३६२७२३/२४