मानसशास्त्र विभाग – Prabodhini Trust Nashik

मानसशास्त्र विभाग

psychology प्रबोधिनी ट्रस्ट संचालित प्रबोधिनी विद्यामंदिर व सह्रीमती सुंनदा केला विद्यामंदिर येथे मानसशास्त्र विभाग चालू करण्यात आला.

मानसशास्त्र विभागात मुलांच्या मानसिक अपंगत्वाचे निदान करण्याचे काम केले जाते. मानसिक अपंगत्वाचे निदान करण्यासाठी विविध बुध्यांक चाचण्याचा वापर केला जातो. मानसशास्त्र विभागात एकूण ७ बुध्यांक चाचण्या आहेत. वय वर्षे ३ ते ४५ वर्षापर्यंत करता येतील अशाच चाचण्या आहेत.

तसेच ० ते ३ वर्षापर्यतच्या मुलांसाठी वैकासिक चाचण्या उपलब्ध आहेत. बुध्यांक तपासणी करणे व पालकांचे समुपदेशन त्याप्रमाणे करणे हा महत्वाचा भाग आहे कारण पालकांना अत्यंत मानसिक धक्का बसलेला असतो.

मानसशास्त्र विभागात संपूर्ण नाशिक जिल्हयातील मानसिक अपंग मुले बुध्यांक तपासणी आणि निदानासाठी येतात. सर्व शिक्षा अभियाना बरोबर पण मानसशास्त्र विभाग काम करतो.

पालक शिक्षण समुपदेशन आणि मार्गदर्शन केले जाते. psychology मुलांसाठी वर्तन उपचार केले जातात. ह्यातून वर्तन समस्या कमी होण्यासाठी मदत होते. वेगवेगळ्या मानस उपचार पद्धतीचा वापर करून एकाग्रता व अवधान वाढवणे, साहचर्यक्षमता वाढवणे, स्मरणशक्ती विकास, चेतना विकास व बौध्दिक विकास वाढविण्यासाठी प्रयत्न केला जातो.

पालकांना व मुलांच्या तणाव मुक्तीसाठी समुपदेशन केले जाते. विविध योजनांची माहिती दिली जाते. विविध योजनांमध्ये विद्यार्थी सहभागी होण्यासाठी मदत केली जाते. समाजजागृती चे काम देखील देखील मानसशास्त्र विभातून केले जाते.