प्रबोधिनी संरक्षित कार्यशाळेमध्ये १८ वर्षापुढील विद्यार्थी प्रवेश घेतात. प्रबोधिनी विद्यामंदिर आणि श्रीमती सुनंदा केले विद्यामंदिर येथील विद्यार्थी कार्यशाळेत येतात. १८ वर्षापासून ५० वर्षावरील विद्यार्थी कार्यशाळेत येतात. १८ वर्षापासून ५० वर्षावरील विद्यार्थी कार्यशाळेत आहेत.
कार्यशाळेमध्ये त्यांना व्यावसायिक शिक्षण दिले जाते. सर्व प्रकारच्या फाईल बनविणे, द्रोण बनविणे, स्क्रीन पेटिंग करणे, कागदी व ओर्गंडी फुले तयार करणे, पुष्पगुच्छ बनविणे कागदी प्लेटस बनविणे, कागदी पिशव्या बनविणे, कापडी पर्सेस आणि पिशव्या बनविणे इ. कामे शिकवून केली जातात. अनेक कंपन्याचे जॉब वर्क पण विद्यार्थी आनंदाने करतात. सततच्या सरावाने मुले छान काम करतात.
दरवर्षी के. के. वाघ कॉलेजची संपूर्ण फाईल्सची ओर्डर कार्यशाळेला मिळते त्याचबरोबर इतरही ओर्देर असतात. ए.बी.बी कंपनीचे जॉबवर्क विद्यार्थी चागंल्याप्रकारे करतात त्याची कॅटीनच्या पापडाची ओर्डेर नियमितपणे असते. वेगवेगळ्या ऑफिसेस आणि कंपन्यामधून, कल्बमधून पुष्पगुच्छाची मागामी असते. वेगवेगळ्या प्रदर्शनामधून प्रबोधिनीच्या स्टॉल वरून अनेक गोष्टीची चागली विक्री होते.
ही कामे विद्यार्थी स्वतंत्रपणे करू शकत नाहीत. शिक्षकाच्या देखरेखीखाली हे विद्यार्थी विविध कामे करतात. शारीरिक वयाबरोबर त्यांच्यातील ताकद वाढत जाते. त्यांच्या वर्तन समस्याही वाढत जातात त्यांना सतत कामात गुंतवून ठेवावे लागते त्यामुळे त्यांच्यातील वर्तन समस्या कमी होतात. त्यांच्यातील शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक समस्या लक्षात घेऊन त्यांना विविध व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या कामाचा मोबदला दिला जातो. दिवाळीमध्ये भेटकार्ड, आकाशकंदील, रंगीत पणत्या कामा केले जाते. फराळाचे पदार्थ बनविले जातात. ह्या सर्वांनाच चांगली मागणी असते.
कार्यशाळेतील बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या कंपन्यामध्ये पूर्णवेळ काम करीत आहेत. फोर्चुना इंजीनिरिंग कंपनीत १७, भारत मिलिंग मध्ये ७, इंडियन पेन कंपनीत ५, नाशिक मेटल मध्ये २, इटन कंपनीत २ विद्यार्थी काम करतात.
थोड्याफार प्रमाणात त्यांचे आर्थिक पुनर्वसन झाले आहे. महत्वाचे म्हणजे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे. अशाच आणखी कंपन्या पुढे आल्या तर मुलांना आत्मनिर्धार करण्यास मदत होईल. हयादृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत.
प्रबोधिनी संरक्षित कार्यशाळा
आय. टी. आय मागे सुशील आय हॉस्पिटल समोर सातपूर नाशिक
फोन नं – ०२५३-२३५१८८०