प्रबोधिनी दिव्यांग पुनर्वसन गृह – Prabodhini Trust Nashik

प्रबोधिनी दिव्यांग पुनर्वसन गृह

Prabodhini Hostel
Prabodhini Hostel
Prabodhini Hostel
Prabodhini Hostel
 

Prabodhini Hostelवयोगट – १० वर्षापुढील मुले- मुली

प्रबोधिनी वसतिगृहात ३० मुले आणि ६ मुली राहतात. मुलांसाठी आणि मुलींसाठी दोन स्वतंत्र प्रशस्त इमारती आहे. एका खोलीमध्ये ६/६ विद्याथ्याची सोय केलेली आहे. प्रत्येकासाठी पलंग, गादी, स्वच्छ चादर आणि मच्छरदाणी, सामान ठेवायला स्वतंत्र कपाट आहे. प्रत्येक खोलीत एक मदतनीस असतो. सोलर , वॉटर प्युरीफायर, सांझा चुल्हा , जेवणासाठी स्वतंत्र हॉल अशा सर्व सोयी उपलब्ध आहेत. बाहेर आवारात फळबाग, फुलबाग व थोड्या प्रमाणात शेती केली जाते. फावल्या वेळात मुलांना खेळण्यासाठी मोठा डोम बांधलेला आहे. त्याठिकाणी विद्यार्थी गाणी, गोष्टी, बैठै खेळ खेळतात. संध्याकाळी थोडा वेळ टी..व्ही बघतात.

सकाळी उठल्यावर ब्रश करणे, चहा दुध बिस्किटे घेतल्यानंतर प्रात:विधी आटोपल्यावर योगशिक्षक विध्यार्थ्याचा व्यायाम आणि योग करून घेतात. नाश्ता झाल्यावर सर्व विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी तयार होतात. साडेदहा पर्यंत सर्व विद्यार्थी बसने शाळेत जातात. ५ वा. विद्यार्थी वसतिगृहात परत येतात. फ्रेश झाल्यावर दुध बिस्किटे घेऊन सर्व जण पटांगणात विविध खेळ खेळतात. गाणी, गोष्टी ऐकतात यासाठी एका विशेष शिक्षकाची नेमणूक केलेली आहे. संध्याकाळी एकत्रितपणे शुभंकरोति ,श्लोक म्हटले जातात. साडेआठ वाजता जेवण करून विद्यार्थी झोपायला जातात.

वसतिगृहाचा सर्व कर्मचारी वर्ग प्रत्येकाची व्यवस्थित काळजी घेतात. मुलांना घरचे वातावरण मिळते त्यामुळे विद्यार्थी आनंदी असतात आणि पालक निश्चिंत असतात. नाशिकचेच नव्हे तर बाहेरगावचे विद्यार्थीही वसतिगृहात आहेत.

व्यवस्थापक, सह व्यवस्थापक, काळजीवाहक, स्वंयपाकी, पहारेकरी, सफाईकामगार असा व्यवस्थित आणि पुरेसा कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. मुलीची काळजी घेण्यासाठी खास महिला कर्मचारी कार्यरत आहेत.

Prabodhini जेवणामध्ये सकस व पौष्टिक आहार दिला जातो. दर रविवारी आणि सणाच्या दिवशी गोडाचे जेवण असते त्यांना सहलीला नेले जाते.

वसतिगृहात नेमणूक केलेले डॉ. दर आठवड्याला येऊन मुलांची तपासणी करतात. गरज पडल्यास मोठ्या हॉस्पिटलमध्ये औषधोपचार केले जातात. दर आठवडयाला दाढी दर महिन्याला केस कापणे, वेळोवेळी नखे कापणे इ. काळजी घेतली जाते.

दर तीन महिन्यांनी सरकारी न्यायाधीश वसतिगृहाची तपासणी करतात. अपंग आयुक्तालय पुणे यांची वसतिगृहास परवानगी आहे. वेळोवेळी समाजकल्याण तर्फे वसतिगृहाची तपासणी केली जाते तसेच संस्थेच्या कार्यकारणीतर्फे अचानक भेट देऊन तपासणी केली जाते.

प्रबोधिनी दिव्यांग पुनर्वसन गृह (वसतिगृह)

प्रबोधिनी वसतिगृह,
स्थापना-२००२ उपेन्द्र्नगर,
साईग्राम अंबड लिंक रोड, नाशिक
फोन नं- ०२५३-२३८४०९६

 
Prabodhini Hostel
Prabodhini Hostel
Prabodhini Hostel
Prabodhini Hostel