बालवाडीमध्ये ३ ते ६ वयोगटातील विध्यार्थ्याना प्रवेश दिला जातो. जितक्या लवकर हे विद्यार्थी शाळेत येऊन विशेष शिक्षण घेतील तितक्या लवकर त्यांच्यात प्रगती दिसून येते. प्रत्येक विध्यार्थ्याच्या बुध्यांक वेगळा आणि समस्याही वेगळी असते. त्याचा संपूर्ण अभ्यास करून विशेष शिक्षक त्याला विशेष शिक्षण देतात.
ह्या मुलांना साध्या साध्या क्रिया करणेही अवघड जाते. उदा : वैयक्तिक स्वच्छता, दात घासणे, ब्रश पकडणे, कपडे घालणे, जेवण करणे, चप्पल बूट घालणे इ. सर्व कौशल्ये त्यांना शिकवावी लागतात. हे सर्व शिकविताना शिक्षकांना खूप संयम ठेवावा लागतो.एकच क्रिया त्यांना वारंवार शिकवावी लागते तेही खूप प्रेमाने.
ह्या मुलांना संगीत खूप आवडते.गाणी, गोष्टी खेळ यातून त्यांना शिकवले जाते. सर्व प्रकारचे मनोरंजनात्मक खेळ घेतले जातात. शैक्षणिक खेळाबरोबरच मनोरंजनात्मक खेळातून व्यावहारिक ज्ञान दिले जाते. बहुतेक मुलांना बोलण्यात अडचणी येतात. भाषा अवगत नसल्यामुळे हावभावातून संवाद साधावा लागतो.
स्पिच थेरपी, फिजीयोथेरपी मुळे त्यांच्यात लवकर प्रगती होते. विशेष शिक्षक, सहशिक्षक, संगीत शिक्षक आणि मदतनीस हे सर्व मिळून विद्यार्थ्याची निट काळजी घेतात. प्रत्येकाला वैयक्तिक शिक्षण दिले जाते. फिजीयोथेरपी मुळे रांगणारी मुले चालायला लागली आहेत. त्यांच्यात झालेली प्रगती पाहून शिक्षकांना आणि त्यांच्या पालकांना झालेला आनंद अवर्णनीय असतो. मुले ६ वर्षाची झाली की पूर्व प्राथमिक गटातून प्राथमिक गटात जातात.
प्रबोधिनी बालमार्गदर्शन केंद्र बालवाडी (सावली)
श्रीमती सुनंदा केले विद्यामंदिर, सातपूर, नाशिक
फोन नं – ०२५३-२३६२७२३/२४