कै. रजनीताई लिमये यांनी १९७७ साली प्रबोधिनी विद्यामंदिर या शाळेची स्थापना केली. प्रबोधिनी ट्रस्ट ची पहिली शाळा. सर्व सुविधांनी सुसज्ज दुमजली इमारत. ह्या शाळेत ३ ते १८ वयोगट असलेले मुले व मुली असे १६० विद्यार्थी आहेत. १० ते १२ विद्याथ्याचा एक गट आहे. मानसिक व शारीरिक वयानुसार बुध्यांक काढून गट तयार करतो व प्रत्येक गटाला एक प्रशिक्षित शिक्षक व एक काळजीवाहक असते. शाळेत एकूण १५ प्रशिक्षित शिक्षक ८ कला शिक्षक आहेत.
प्राथमिक गटातील मुलाना शिक्षक स्वावलंबन कौशल्य शिकविण्यावर जास्त भर देतात जेणे करून त्यांना स्वत:चे काम स्वत: करता यावे. माध्यमिक गटातील मुले लेखन, वाचन आणि अंकगणित थोड्याफार प्रमाणात करू शकतात. व्यवसापूर्व गटातील मुलांना व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते यासाठी मुलांना अभ्यासाबरोबर कागदी पिशव्या बनविणे, आकाशकंदील बनविणे, राख्या तयार करणे पणत्या रंगविणे, क्राफ्टच्या वेगवेगळ्या वस्तू बनविणे , गृहशास्त्राच्या वस्तू बनविणे इत्यादी शिक्षण दिले जाते. त्यामुळे मुलांची काम करण्याची क्षमता वाढते. वयात येणा-या मुलांना कामात गुंतवून ठेवल्यामुळे त्यांच्या वर्तन समस्या कमी होण्यास मदत होते.
या गोष्टीबरोबरच मुलाना आनंदी ठेवण्यासाठी प्रेक्षणीय ठिकाणाच्या सहली, वेगवेगळी शिबिरे, नृत्य नाटक व वार्षिक स्नेहसंमेलन इ.उपक्रम राबवले जातात. चित्रकला, हस्तकला, शिवण, खेळ, इ. विषय शिकवून मुलांचा सर्वागीण विकास करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी सतत प्रयत्नशील असतात.
ह्या शाळेला १३० विध्यार्थ्यासाठी सरकारी अनुदान आहे अतिरिक्त मुलांचा खर्च संस्थेलाच करावा लागतो. तीव्र , मध्यम व सौम्य स्वरूपाचे वर्गीकरण करून त्यानुसार गट करून प्राथमिक, माध्यमिक व व्यवसायपूर्व गट केले जातात व त्यानुसार भारतीय पुनर्वास परिषद मान्यताप्राप्त F.A.C.P. हा विशेष अभ्यासक्रम राबवला जातो व त्यानुसार परीक्षा घेतल्या जातात. वर्षातून दोनवेळा तज्ञ डॉ. मार्फत आरोग्य तपासणी केली जाते. शाळेत सर्व सन उत्सव साजरे केले जातात त्यामुळे मुलांना सणाचे महत्व कळते. मुलांना मधल्या सुटीत पौष्टिक आहार दिल्या जातो. प्रत्येक विभागात स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय आहे. शाळेला प्रशस्त क्रीडागण व फुलबाग आहे.
प्रबोधिनीने गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य बालनाट्य महोत्सवाच्या अंतिम फेरीत अपंग गटात सर्वोत्कृष्ट अपंग निर्मितीचा पुरस्कार मिळवून विशेष मुले कुठेही कमी नाहीत हे दाखवून दिले आहे. शहाणपण देगा देवा आणि शाळा आजोबांची ही ती नाटके यात दोन मुलांना अभिनयाची रौप्यपदके व रोख पाच हजार रुपये आणि दोघांना अभिनयाची प्रमाणपत्रे मिळाली आहेत.
आमचा हा जगन्नाथाचा रथ पुढे जाण्यासाठी समाजातील संवेदनशील दानशुर व्यक्तींना आर्थिक मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे. आपल्यासारख्या सहृदय व्यक्तीमुळेच आमचा माणुसकीचा विश्वास अढळ आहे. आपल्या मदतीच्या प्रतिक्षेत आहोत.
प्रबोधिनी विद्यामंदिर
लेन नं २ जुनी पंडित कॉलनी,
शरणपूर रोड
नाशिक ४२२००२
फोन नं. ०२५३-२५७९७१६