फिजियोथेरपी विभाग – Prabodhini Trust Nashik

फिजियोथेरपी विभाग

उदिष्ट्ये
Physiotherapy मानसिक वा शारीरिक शारीरिक दृष्ट्या अपंग असलेल्या मुलांमध्ये फिजियोथेरपीचे अत्यंत महत्व आहे. मुलांमध्ये अपंगत्वाची तीव्रता कमी करणे आणि त्यांच्या आयुष्याचा दर्जा वाढवून त्यांना स्वावलंबी बनविणे व त्यांच्या पालकांस सहाय्य करणे हे मुल उदिष्ट फिजियोथेरपीचे आहे.

बाळाच्या डेव्हलपमेंटल माईलस्टोन्स कशा आहेत हे ओळखून त्यांच्या शारीरिक क्रियांना प्रोत्साहन देणे. [६ महिन्याच्या पुढील बाळ]

किशोरवयीन मुलांमध्ये त्यांच्या शारीरिक, मानसिक वाढीप्रमाणे त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करणे.

कार्य
फिजियोथेरपीस्ट हे मुलांच्या जवळ राहून त्यांच्या पालकांच्या शाळेच्या आणि इतर वैद्यकीय कार्यात राहून त्याना मदत करते.

प्रारंभिक हस्तक्षेप मध्ये फिजियोथेरपीचा मोठा भाग असतो. अव्याच्या जितक्या कमी वयात मुलाला व्यायाम मिळतो तितका त्याचा शारीरिक विकास व्हायला मदत होते.

मुलांच्या स्नायूंमध्ये ताकद वाढविणे त्यांच्या तोलाकडे लक्ष देऊन तयार बदल आणण्याचा प्रयत्न करणे. [ Balance & Coordination]

Physiotherapy ढोबळ कार्य [Gross Motor] आणि सुष्म कार्य [Fine Motor] करण्यास प्रोत्साहित करणे, स्नायू मजबूत करणे, पाठीच्या कण्याच्या ठेवणी [Cervival Thoralic & Lumbar] याच्यावर काम करणे बाकी शरीराच्या भागांवर काम करून त्याला नैसर्गिक स्थिती देण्याचा प्रयत्न करणे. त्यांच्या हालचालीवर काम करून त्यांचा दर्जा वाढविणे. पालकांशी सल्लामसलत करणे त्यांना व्यायाम करून घेण्यास प्रोत्साहित करणे. मुलांना वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या लोकांमध्ये घेऊन जाण्यास पालकांना सहाय्य करणे.

सगळ्यात महत्वाचे [पालकांसाठी]

मुलांना त्यांच्या क्षमता नुसारच व्यायाम घ्यावे लागतात. मुलांमध्ये १००% बदल होईल असे नसते पण योग्य उपचार ने त्यांच्या आयुष्यात नक्कीच चागंले बदल होतात.

आमच्या दोन्ही शाळांमध्ये सर्व सुविधांनी सुसज्ज असे फिजियोथेरपी विभाग आहेत. शाळेतील मुलांबरोबरच बाहेरील मुलेही ह्या सुविधेचा लाभ घेतात. सर्वाकडून नाममात्र फी आकारली जाते. फिजियोथेरपीमुळे शाळेतील न बसणारी मुले रांगायला व रांगणारी मुले चालायला लागलेली आहेत. अशा’ प्रकारे त्या मुलांमध्ये लक्षणीय प्रगती दिसून येते.